धुळे : महापालिकेत वर्षभरात झालेल्या महासभापैकी आजची महासभा ही चांगलीच वादळी ठरली. महापालिकेकडे कोट्यावधींचा निधी येवूनही काही प्रभागांमध्ये तसू भरही काम न झाल्याने महासभेच्या सुरुवातीलाच हद्दवाढीच्या गावातील नगरसेवकांनी एल्गार पुकारला. नगरसेवक किरण अहिरराव यांनी आसनावर न बसता थेट जमीनीवरच ठिय्या मांडून मनपा प्रशासनाचा निषेध केला. शहर हद्दवाढीतील गावात विकासकामे सुरू व्हावीत यासाठी हे सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यांना लगेचच अन्य नगरसेवक संजय पाटील, निशा पाटील, वंदना भामरे यांनी पाठींबा देत सभागृह डोक्यावर घेतले. सत्ताधारी असूनही कामे होत नसल्याचे सांगत आम्ही नगरसेवक आहोत की मुकादम असे करण्यात येत आहे, असा संतप्त सवालही भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे. याशिवाय, झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्याचे काम आम्ही करत असल्याची भावना त्यांनी यावेळी मांडली.
धुळे महापालिकेत भाजप नगरसेवकाचा राडा, जमीनीवर बसून केला निषेध