सोनखेड येथे एका चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली . . या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सकाळपासून रोखून धरला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोनखेड गावातील चिमुकली मंगळवारी (२५ फेब्रुवारीघराबाहेर खेळत होती. खेळता-खेळता ती बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळली नाहीत्यानंतर बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ही मुलगी दगडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत रडत असताना एका व्यक्तीला दिसली. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मुलीला ताब्यात घेतलंमुलीची अवस्था गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी तिला रुग्णलयात दाखल केले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी पोस्को आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला
चिमुरडीवर अत्याचार, ग्रामस्थांनी नागपूर महामार्ग अडवला