बरेच लोकांना वाटतं जे लोक गावी जातायत त्यांनी पुन्हा पुण्यात मुंबईला येऊ नये. बरोबर आहे पण त्या गरीब लोकांना पुण्या, मुंबई मध्ये राहण्या साठी भाड भराव लागत पोटा साठी कमवाव लागत हे लोक महाराष्ट्रातील इतर गावातून आलेले असतात कमावण्या साठी मग त्यांना का बोलता पुन्हा येऊ नका पुण्यात.
राहिली गोष्ट त्यांच्या घरी जाण्याची,
परिस्थिती तशीच आहे त्या मुळे जावं लागत लोकांना आपण घेणार का काळजी त्यांची मग का बोलायचं?
आणि परदेशीं भारतीय लोकांना जसं सन्मानाने भारतात आणलं जात तस भारतातल्या गरीब जनतेला सन्मानाने घारी सोडवले पाहिजे आणि पोलिसांनी देखील हाना मारी ना करता त्यांना घरी सोडवायला पाहिजे.
आज किती कुटुंब पायी प्रवास करून घरी चाललेत आहेत याचा सरकार ने विचार करायला पाहिजे